निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुक्यातील निंभोरा बु.येथील रहिवाशी दगडु उर्फ अजय ज्ञानेश्वर राजपूत वय(२६) या युवकास मध्य रेल्वेच्या निंभोरा ते रावेर डाऊन लाईन वरील रेल्वे खांब क्र.४६९/१२ ते १४ दरम्यान आज संध्याकाळी ५:४२वा.मि च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.
असून मयताचे वडील ज्ञानेश्वर भावसिंग राजपूत यांनी प्रेताची ओळख पटविली असता पंचांसमक्ष पंचनामा करून निंभोरा पोलीस स्टे.ला गुरनं २/२०२३ सीआरपीसी कलम १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत निंभोरा पोलीस स्टे.चे सपोनी गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पो.हेका ज्ञानेश्वर चौधरी,पोना ईश्वर चव्हाण हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






