बोळे वि.का.सोसाच्या चेअरमन प्रदीप गिरासे तर व्हा.चेअरमनपदी गुलाब गिरासे यांची बिनविरोध निवड

Spread the love

पारोळा : – निवडणुकीमुळे एकाच गावात २ गट तयार होणे, त्याच्याने वाद निर्माण होणे यातुन गावाची शांतता भंग होते. त्यामुळे बोळे येथील ग्रामस्थांनी एकमत करत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्यात आली.

त्यानंतर गेल्या २ दिवसांपुर्वीच बोळे विकासोची चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवड देखील बिनविरोध करून इतर गावांना गावातील एकोप्याचा संदेश दिला. या निवडीबद्दल चेअरमन प्रदीप आबा गिरासे, व्हा.चेअरमन गुलाब रामसिंग गिरासे व सर्व संचालक मंडळाचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.अमोलदादा पाटील यांनी कौतुक करत अभिनंदन केले.

हे देखील वाचा

टीम झुंजार