पारोळा : – निवडणुकीमुळे एकाच गावात २ गट तयार होणे, त्याच्याने वाद निर्माण होणे यातुन गावाची शांतता भंग होते. त्यामुळे बोळे येथील ग्रामस्थांनी एकमत करत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्यात आली.
त्यानंतर गेल्या २ दिवसांपुर्वीच बोळे विकासोची चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची निवड देखील बिनविरोध करून इतर गावांना गावातील एकोप्याचा संदेश दिला. या निवडीबद्दल चेअरमन प्रदीप आबा गिरासे, व्हा.चेअरमन गुलाब रामसिंग गिरासे व सर्व संचालक मंडळाचे आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती मा.अमोलदादा पाटील यांनी कौतुक करत अभिनंदन केले.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






