दोन अत्यंत जिवलग मित्रांनी, एकाच झाडाच्या ,एकाच फांदीला, एकाच वेळी गळफास घेवून जीवन संपविले

Spread the love

कोल्हापूर : एकाच वेळी गळफास लावून दोघा मित्रांनी आपले जीवन संपवल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील पारगाव गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. विनायक शिवाजी पाटील (वय 40) आणि बाबासाहेब हिंदुराव मोरे (वय 41) असे या दोघां जिवलग मित्रांचे नाव आहे. वडगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने कोल्हापूर हादरले आहे. दोघेही एकमेकांचे अत्यंत जिवलग मित्र होते. त्यांना परिसरात जय-विरूची जोडी बोलत. दोघांनी एकाच झाडाला आणि एकाच फांदीला गळफास लावून जीवन संपवले.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार विनायक पाटील आणि बाबासाहेब मोरे दोघेही नेहमीच एकत्र पाहायला मिळायचे. दुचाकी गाडीवर अनेकदा गावकऱ्यांना दिसायचे. यातील विनायक याचा चिरा-दगड पुरविण्याचा व्यवसाय होता, तर बाबासाहेब मोरे याचा जनावरांचा गोठा होता. अनेकदा ते एकत्रच पाहायला मिळायचे. त्यांच्या भागातील लोक त्यांना जय-विरूची जोडी बोलायचे. मात्र, दोघांनी जगाचा निरोप घ्यायचा निर्णय घेत एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आज सोमवारी दुपारी येथील तात्यासाहेब कोरे मिलीटरी हायस्कूल परिसरात एका झाडाला गळफास लावल्याचे उघड झाले.

दोघांच्याही डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर : दोघांच्याही डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने त्यांनी हा आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. या घटनेची वडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. विनायक पाटील यांच्या पाश्चात आई, मुलगा, पत्नी आणि केवळ 10 दिवसांची मुलगी आहे, तर आणि बाबासाहेब मोरे यांच्या पश्चात्य आई, वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. विनायक शिवाजी पाटील (वय 40) आणि बाबासाहेब हिंदुराव मोरे (वय 41) असे या दोघां जिवलग मित्रांचे नाव आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार