कोपरगाव :- तालुक्यातील पढेगाव येथील वारकरी सांप्रदयाच्या शेतकरी कुटुंबातील भागीरथीबाई भगीरथ शिंदे (वय 70) व त्यांचे पती ह.भ.प. भगीरथ दगडू शिंदे (वय 73) यांचे मंगळवारी (दि.4) निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी , दोन मुले,जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. दोघांचाही एकाच दिवशी तीन तासांच्या अंतराने मृत्यू झाल्याने त्याची चर्चा सोशल मिडीयावरून सर्वत्र होत असून हळहळ व्यक्त होत आहे.
मंगळवारी पत्नी भगीरथीबाई यांचे सकाळी 10.15 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या जाण्याने नातेवाईकांचा आक्रोश सुरु होता. अंत्यविधिची तयारी चालु असताना त्याच दिवशी तीन तासांच्या अंतराने दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भगीरथ यांचेही हृदयविकाराने निधन झाले.एकाच दिवशी आई-वडीलांचे निधन झाल्यामुळे शिंदे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास पढेगाव वैकुंठभूमीत या दांपत्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.जेमतेम परिस्थिती असलेले हे शेतकरी कुटुंब समाधानी व धार्मिक होते.त्यांच्या पाठोपाठ जाण्यामुळे स्वर्गातून भगीरथापाठोपाठ गंगा पृथ्वीवर आली आणि भागीरथी झाली, आज भागीरथी पाठोपाठ भगीरथ वैकुंठाला गेला अशी हळहळ व्यक्त होत होती.
हे देखील वाचा
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती
- एरंडोल येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न.
- होय एरंडोलच : अखेर ॲड. आकाश महाजन यांचा प्रयत्नांना यश.
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.






