पारोळा :- कृ.उ. बाजार समितीच्या आलेल्या अर्जांच्या छाननीत काही अर्जांवर हरकती आल्या होत्या. त्यावर चर्चा होऊन आज सुनावणी झाली.यात माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय या दोन्ही मतदारसंघातील अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा परिषद माजी सभापती डॉ. दिनकर चुडामण पाटील यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अर्जांवर हरकती घेतल्या होत्या. त्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यानुसार निवडणूक अधिकारी कासार यांनी ही दोघ नामांकन अवैध ठरविले. तसेच माजी सभापती अमोल चिमणराव पाटील यांच्या नामांकनावर घेतलेल्या हरकतीस फेटाळून लावून त्यांचे नामांकन वैध ठरविण्यात आले. तसेच रेखाताई सतीश पाटील यांचाही उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.
१५५ उमेदवार रिंगणात
एकूण १६० नामांकनापैकी पाच नामांकन अवैध ठरविण्यात आले असून १५५ नामांकन रिंगणात आहेत. सेवा सहकारी गटातून सर्वसाधारण एक इतर मागासवर्गीय एक ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन तर आर्थिक दुर्बल एक अशी एकूण पाच नामांकन अवैध करण्यात आले आहे. तीन उमेदवारांनी आपले सातबारा व शेतकरी असल्याचा दाखला दिला नसल्याने त्यांची नामांकने रद्द ठरविण्यात आली आहेत. दरम्यान बाजार समितीच्या 18 जागेसाठी 155 उमेदवाराचे नामांकन वैध ठरविण्यात आले आहेत आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष 20 एप्रिल पर्यन्त मुदत असलेल्या माघारीवर आहे. त्या नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
हे देखील वाचा
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






