पारोळा :- कृ.उ. बाजार समितीच्या आलेल्या अर्जांच्या छाननीत काही अर्जांवर हरकती आल्या होत्या. त्यावर चर्चा होऊन आज सुनावणी झाली.यात माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे सर्वसाधारण व इतर मागासवर्गीय या दोन्ही मतदारसंघातील अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.
जळगाव जिल्हा परिषद माजी सभापती डॉ. दिनकर चुडामण पाटील यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अर्जांवर हरकती घेतल्या होत्या. त्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला होता. त्यानुसार निवडणूक अधिकारी कासार यांनी ही दोघ नामांकन अवैध ठरविले. तसेच माजी सभापती अमोल चिमणराव पाटील यांच्या नामांकनावर घेतलेल्या हरकतीस फेटाळून लावून त्यांचे नामांकन वैध ठरविण्यात आले. तसेच रेखाताई सतीश पाटील यांचाही उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.
१५५ उमेदवार रिंगणात
एकूण १६० नामांकनापैकी पाच नामांकन अवैध ठरविण्यात आले असून १५५ नामांकन रिंगणात आहेत. सेवा सहकारी गटातून सर्वसाधारण एक इतर मागासवर्गीय एक ग्रामपंचायत सर्वसाधारण दोन तर आर्थिक दुर्बल एक अशी एकूण पाच नामांकन अवैध करण्यात आले आहे. तीन उमेदवारांनी आपले सातबारा व शेतकरी असल्याचा दाखला दिला नसल्याने त्यांची नामांकने रद्द ठरविण्यात आली आहेत. दरम्यान बाजार समितीच्या 18 जागेसाठी 155 उमेदवाराचे नामांकन वैध ठरविण्यात आले आहेत आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष 20 एप्रिल पर्यन्त मुदत असलेल्या माघारीवर आहे. त्या नंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.
हे देखील वाचा
- Viral Video: एक तरुण स्टंटबाजी करण्यासाठी धावत्या लोकल ट्रेनच्या छतावर चढला अन् अचानक पुढं भयंकर घडलं; पहा व्हिडिओ
- रस्त्यावरील विजेचा खांब बाजुला करा,या मागणीसाठी एका नागरिकाने चक्क विजेचा खांबावरच खाट बांधून केले उपोषण
- अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्यांच्या खून करणाऱ्या आई व तिच्या प्रियकरास जन्मठेप.
- “माझा मृत्यू माझ्या पत्नीच्या छळामुळे झाला” असे माझ्या शवपेटीवर लिहा ही माझी शेवटची इच्छा आहे अशी सुसाईट नोट लिहून तरुणाने केली आत्महत्या.
- एक तरुण नोकरी गेल्याने निराश होऊन कंटाळून आपल्या देशात येण्यासाठी निघाला अचानक त्याच्या नशिबाची बंद कवाडे उघडली अन् तो झाला 13 कोटींचा मालक