(योगेश मोरे, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी)
खरीप हंगामामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1 हजार 300 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आल्याचं भुमरे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ‘देवगिरी मैदान’ पोलीस आयुक्त कार्यालय येथे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पार पडला. त्यावेळी शुभेच्छा संदेशपर भाषणात ते बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलताना भुमरे म्हणाले की, शेतकरी आपल्या राज्याचा मुख्य कणा आहे.
शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत आहे. सिंचनाचे प्रमाण वाढावं म्हणून राज्य सरकार पुरेशा उपाय योजना करत आहे. पहिल्या टप्यात यशस्वी ठरलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. दुसऱ्या टप्यासाठी जिल्ह्यातील 119 गावांची निवड करण्यात आली आहे. आराखडा तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
हे देखील वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






