जामनेर : राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे अवकाळीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
आता जनावरांवरही हे संकट घोंगावत आहे. गारपीट आणि वादळी पावसाच्या तडाख्यात सापडून साडेपाचशे मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील पिंपळगाव, नांदगाव भागात घडलीय असून या घटनेमुळे मेंढ्या पालन करणाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जामनेर तालुक्यात मागील काही दिवसापासून गारपिटीसह वादळी पावसाने तडाखा दिला आहे. याच दरम्यान, काल रविवारी पिंपळगाव आणि नांदगाव परिसरात शेत शिवारात वास्तव्यास असलेल्या भगवान कोळेकर आणि सीताराम कोळेकर या मेंढपाळाच्या मेंढ्या वादळात सापडल्या. वादळी वाऱ्यांचा तडाखा जोरदार असल्याने आणि कोणताही आडोसा बाचावासाठी जवळ नसल्याने या मेंढ्या वादळी वाऱ्यात सापडल्या.
हे देखील वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






