पारोळा – शहरातील भुईकोट किल्ला हा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या काळापासुनची ऐतिहासिक वास्तु म्हणुन माणली जाते. या किल्ल्यात अतिप्राचिन खंदक देखील आहे. गत काळात या किल्ल्याचा जतन व संवर्धनासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी प्रयत्न केले होते. तेव्हा बरिचशी विकासकामे देखील करण्यात आली. परंतु निधी अभावी या भुईकोट किल्ल्याची उर्वरित कामे करता आली नाही. त्यात अति महत्त्वाचे म्हणजे किल्ल्यातील खंदक. प्राचीन काळापासुन हे खंदक आजही आहे त्या अवस्थेतच आहे.
हा किल्ला ऐतिहासिक वास्तु असल्याने देशभरातुन पर्यटक व संशोधक येथे येत असतात. या किल्ल्याचे जतन व संवर्धन होऊन ही ऐतिहासिक वास्तु पर्यटन स्थळ म्हणुन विकसित व्हावे यासाठी आमदार चिमणराव पाटील हे अनेक वर्षांपासुन प्रयत्नशिल होते. या किल्ल्यात विशेष म्हणजे खंदकाचे पुनरूज्जीवन करणे हे अत्यंत महत्त्वाचे होते. सद्यपरिस्थिती हे खंदक अतिशय दुरावस्थेत आहे.
गेल्या अनेक दशकांपासुन खंदकातील पाणी अशुद्ध असल्याने खंदकाचा भोवती घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत असल्याने आरोग्याला देखील याचा मोठा धोका होता. ही परिस्थिती बदलावी, हे ऐतिहासिक खंदक शहरवासियांसह पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना एक आकर्षण व्हावे व या खंदकात साठवलेल्या पाण्यावर योग्य ती प्रक्रीया करून हे पाणी शहरवासियांचा उपयोगात यावे हि आमदार चिमणराव पाटील यांची दुरदृष्टी होती.
त्यासाठी आमदार चिमणराव पाटील हे सतत पाठपुरावा करित होते. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असुन महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडुन अमृत २.० अभियानांतर्गत या भुईकोट किल्ल्यातील खंदकाचा पुनरूज्जीवन व सुशोभिकरणासाठी ४.९७ कोटी रूपयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष तथा लाडके मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांचे आभार मानले आहेत.
हे देखील वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम