वडिलांनी नविन मोटारसायकल घेवू दिली नाही म्हणून पती- पत्‍नीने उचलले टोकाचं पाऊल, अन् वडिलांनीही संपवले आयुष्य.

Spread the love

नंदूरबार :- जिल्ह्यातील नवापूर शहरात कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवापूर शहरातील तीनतेंभा भागातील रहिवासी असलेले सावंत सय्यद गावित त्यांच्या पत्नी रोशनी सावंत गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित या तिघांनी रात्रीच्या सुमारास फुलफळी भागात असलेल्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

नवापूर शहरातील तीनटेंभा भागातील रहिवासी सावंत सय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन मोटरसायकलीची मागणी केली होती. मात्र वडिलांनी ती घेऊन दिली नाही. या विषयावरून रागाच्या भरात सावंत गावित आणि त्यांची पत्नी रोशनी गावित यांनी फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. हे चित्र पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली.

सदरच्‍या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी तपास करत घटनेचा पंचनामा करून तिघही मृतदेह नवापूर उपजिल्हा रुग्णालय पाठविले आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार