नंदूरबार :- जिल्ह्यातील नवापूर शहरात कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवापूर शहरातील तीनतेंभा भागातील रहिवासी असलेले सावंत सय्यद गावित त्यांच्या पत्नी रोशनी सावंत गावित आणि वडील सय्यद कर्मा गावित या तिघांनी रात्रीच्या सुमारास फुलफळी भागात असलेल्या रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नवापूर शहरातील तीनटेंभा भागातील रहिवासी सावंत सय्यद गावित यांनी वडिलांकडे नवीन मोटरसायकलीची मागणी केली होती. मात्र वडिलांनी ती घेऊन दिली नाही. या विषयावरून रागाच्या भरात सावंत गावित आणि त्यांची पत्नी रोशनी गावित यांनी फुलफळी भागातील रेल्वे रुळावर आत्महत्या केली. हे चित्र पाहून वडील सय्यद गावित यांनीही रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली.
सदरच्या घटनेने नवापूर शहरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना कळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, जमादार युवराज परदेशी, विकी वाघ यांना घटनास्थळी तपास करत घटनेचा पंचनामा करून तिघही मृतदेह नवापूर उपजिल्हा रुग्णालय पाठविले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






