दाहोद :- (गुजरात) मधील दाहोदमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पतीनेच त्याच्या पत्नीचे अपहरण करून मित्रांसमवेत तिचा बलात्कार केला व तिला मारहाण करत तिची हत्या केली. या घटणेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर या प्रकरणी दखल घेउन आरोपीला अटक केले, व पुढील चौकशी सुरू केली आहे.
एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला तिच्या पतीपासून वेगळी होऊन मेहसाणाच्या चान्समा येथे एका पुरुषासोबत राहत होती. या महिलेला चार मुले असून ते तिच्या पती सोबतच राहत आहे. ही महिला 28 मे रोजी एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आली. तेथे तिचा पती त्याच्या तीन मित्रांन समवेत आला होता.
पहिले त्याने महिलेला भेटण्यासाठी बोलवले, तिने भेटण्यासाठी नकार दिल्यानंतर त्याने तिचे अपहरण केले व तिला एका वाहनात मारगाळा गावात आणून तिच्यावरती तिघांनी बलात्कार केला. महिला मदतीसाठी आरडाओरडा करत होती, मात्र तिचा पती तिला मारहाण करत होता. दरम्यान, कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला, त्याची दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाची पतीसह तिघांना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. असे पोलिसांनी सांगितले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






