जालना :- जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. बायको गावाला गेली असताना घरात कुणी नसल्याची संधी साधत एका नराधमाने आपल्याच सासूवर अत्याचार केला आहे.शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३८ वर्षीय आरोपी हा पत्नीसह शहरातील चंदनझिरा परिसरात राहतो. त्याची ६५ वर्षीय सासू देखील त्यांच्याकडे राहत होती. आरोपी आणि त्याची पत्नी एका शेतकऱ्याकडे राखणदार म्हणून करतात. बुधवारी रात्री सदर वृद्ध महिलेची लेक नातेवाईकांकडे गेली होती. त्यादिवशी मध्यरात्री जावई दारू पिऊन घरी आला आणि झोपेत असलेल्या सासूवर अत्याचार केला. वृद्धेने प्रतिकार केला असता, नराधम जावयाने तिला बेदम मारहाण देखील केली.
या घटनेनंतर वृद्ध महिला प्रचंड घाबरली. तिने घडलेला प्रकार प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मुलीला सांगितला. पतीनेच आपल्या आईवर बलात्कार केल्याचं समजताच बायकोची पायाखालची जमीनच सरकली.
तिने तातडीने आईला घेऊन पोलिसांत धाव घेतली. दरम्यान, पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर नराधम जावई फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. जावयानेच सासूवर अत्याचार केल्याचं उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






