VIRAL VIDEO नवी दिल्ली :- प्रगती मैदान बोगद्याजवळ शनिवारी (२४ जून) लुटीची एक धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी बंदुकीच्या धाकाने एका डिलिव्हरी एजंटला आणि त्याच्या साथीदाराला लुटलं आहे.
चोरट्यांनी अवघ्या १२ सेकंदात पैशांनी भरलेली बॅग लंपास केली. या बॅगेत दोन लाख रुपये होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात केलेली नाही. घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी एजंट आणि त्याचा साथीदार पैशांनी भरलेली बॅग घेऊन गुरुग्रामला जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी कारचा पाठलाग करत दोघांना लुटलं. लुटीची ही घटना बोगद्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत दिसत आहे की, दोन दुचाकीवरून आलेल्या चार दरोडेखोरांनी प्रगती मैदान बोगद्याजवळ भररस्त्यात डिलिव्हरी एजंटची कार आडवली. यातील दोन सशस्त्र दरोडेखोर दुचाकीवरून खाली उतरले. यातील एकाने कारमधील दोन व्यक्तींकडे बंदूक रोखली, तर अन्य एकाने कारच्या मागच्या सीटवर असलेली पैशांनी भरलेली बॅग हिसकावली. यानंतर हे दरोडेखोर क्षणार्धात घटनास्थळावरून फरार झाले.
लुटीची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांनी अवघ्या १२ सेकंदात दोघांना लुटलं असून दोन लाख रुपये ठेवलेली बॅग लंपास केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






