नवादा (बिहार) :- जिल्ह्यात एका विवाहित महिलेचं अफेअर सुरू होतं. महिलेचा प्रियकर तिच्या घरी लपून तिला भेटायला आला होता तेव्हा तो पकडला गेला. त्यानंतर त्याला पकडून मारहाण करण्यात आली आणि त्याला डांबून ठेवण्यात आलं.जेव्हा महिलेच्या पतीला हे माहीत पडलं तेव्हा त्याने दोघांचं मंदिरात जबरदस्ती लग्न लावून दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस म्हणाले की, या घटनेची कुणीही तक्रार दाखल केली नाही.
ही घटना कहुआरा गावातील आहे. इथे एक तरूण रात्री उशीरा कामासाठी बाहेर गेला तेव्हा त्याच्या पत्नीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी आला. कुटुंबियांनी दोघांना पकडलं आणि मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही बांधून ठेवण्यात आलं. जेव्हा महिलेच्या पतीला समजलं तेव्हा तो भडकला. त्याने घरी आल्यावर दोघांनाही मंदिरात नेलं आणि त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं.
पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावण्यात आलं तेव्हा आजूबाजूचे लोकही जमा झाले होते. लोकांसमोरच प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर दोघांनाही गावातील लोकांनी त्यांना गावाबाहेर काढलं. यावर महिलेचा पती काहीच बोलला नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
महिलेचा प्रियकर नक्शेना गरहीया गावात राहणारा आहे. तो विवाहित आहे आणि तीन मुलांचा वडील आहे. तेच महिला कहूआरा गावात राहणारी आहे. तिलाही दोन मुलं आहेत. पोलीस म्हणाले की, अजून याबाबत कुणाचीही तक्रार आली नाही.
हे पण वाचा
- पत्नीला सर्व सुखसुविधा मिळाव्यात म्हणून पती कामानिमित्त घराबाहेर, प्रियकर पत्नी जवळ घरी, एक दिवस डाव साधला अन् केला मोठा कांड!
- ३६ वर्षीय महिलेचे १६ वर्षीय अल्पवयीन मुलावर प्रेम जडले अन् एके दिवशी त्यास फूस लावून पळवून नेले; चार महिन्यानंतर एका पोस्टने पितळ पडले उघडे.
- मालेगावात एका बहाद्दराने जिवंत असतांना बनविला मृत्यूचा दाखला; काय आहे प्रकरण सत्य ऐकून हैराण व्हाल.
- बोदवड जवळ ट्रक चालकाचे लोकेशन चुकल्याने बंद फाटक तोडून ट्रक रेल्वेमार्गावर आलेल्या मुंबई- अमरावती एक्स्प्रेसची धडक, सुदैवाने मोठी हानी टळली.
- धरणगाव येथे ‘संविधान सन्मान परिषदेची’ बैठक उत्साहात संपन्न !राज्यस्तरीय संविधान सन्मान परिषदेचे साक्षीदार व्हावे;प्रा.डॉ.भरत शिरसाठ