नवादा (बिहार) :- जिल्ह्यात एका विवाहित महिलेचं अफेअर सुरू होतं. महिलेचा प्रियकर तिच्या घरी लपून तिला भेटायला आला होता तेव्हा तो पकडला गेला. त्यानंतर त्याला पकडून मारहाण करण्यात आली आणि त्याला डांबून ठेवण्यात आलं.जेव्हा महिलेच्या पतीला हे माहीत पडलं तेव्हा त्याने दोघांचं मंदिरात जबरदस्ती लग्न लावून दिलं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. पोलीस म्हणाले की, या घटनेची कुणीही तक्रार दाखल केली नाही.
ही घटना कहुआरा गावातील आहे. इथे एक तरूण रात्री उशीरा कामासाठी बाहेर गेला तेव्हा त्याच्या पत्नीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी आला. कुटुंबियांनी दोघांना पकडलं आणि मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही बांधून ठेवण्यात आलं. जेव्हा महिलेच्या पतीला समजलं तेव्हा तो भडकला. त्याने घरी आल्यावर दोघांनाही मंदिरात नेलं आणि त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं.
पत्नी आणि तिच्या प्रियकराचं लग्न लावण्यात आलं तेव्हा आजूबाजूचे लोकही जमा झाले होते. लोकांसमोरच प्रियकराने विवाहित प्रेयसीच्या भांगेत कुंकू भरलं. यानंतर दोघांनाही गावातील लोकांनी त्यांना गावाबाहेर काढलं. यावर महिलेचा पती काहीच बोलला नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
महिलेचा प्रियकर नक्शेना गरहीया गावात राहणारा आहे. तो विवाहित आहे आणि तीन मुलांचा वडील आहे. तेच महिला कहूआरा गावात राहणारी आहे. तिलाही दोन मुलं आहेत. पोलीस म्हणाले की, अजून याबाबत कुणाचीही तक्रार आली नाही.
हे पण वाचा
- गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रोत्साहन आमदार मा.अमोलदादा पाटील
- मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी जात असलेल्या दोघांना डंपरची जोरदार धडक,दुचाकीस्वार तरुण ठार तर मित्र गंभीर जखमी.
- एरंडोल येथे वैफल्यग्रस्त ३८ वर्षीय युवकाची गळफास घेवून संपविले जीवन.
- मोयखेडा दिगरला घरकुल नाही तर कुळघर/ घरकुल योजनेचा फज्जा; गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सुद्धा समितीचा चौकशीकडे कानाडोळा.
- प्रवीण गायकवाडांवरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे निवेदन