चोरी व घरफोडी गुन्ह्यातील तिघे आरोपींना एलसीबीने केले जेरबंद,तीन गुंन्हे उकडीस, 2 दुचाकी 2 मोबाईल जप्त.

Spread the love

जळगाव :- शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यातच जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी दुचाकी व मोबाईल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांचे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या. तिघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीस स्टेशनसह धरणगाव पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी आणि दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे धरणगाव शहरातील आणि जळगावातील असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.

त्यानुसार पथकाने धरणगाव शहरातून संशयित आरोपी राजू भिमसिंग बारेला (वय-२३) आणि दिपक सुमऱ्या बारेला (वय-२९) दोन्ही रा. मधुकर नगर, धरणगाव यांना अटक केली. दोघांकडून चोरीच्या दोन दुचाकी आणि एक मोबाईल हस्तगत केला.

तर दुसऱ्या पथकाने संशयित आरोपी रमेश फुलसिंग देवरे (वय-२३) रा. श्रीकृष्ण लॉनी, जळगाव याला जळगावातून अटक केले. त्याच्याकडून १ चोरीचा मोबाइल हस्तगत केला आहे. पुढील कारवाईसाठी धरणगावातील दोघांना जळगाव तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले तर जळगावातील चोरट्यांला एमआयडीसी पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार