8 महिन्यांचे बाळ व कुटुंब सोडून तो घरून निघून गेला, कुटुंबाने पत्नीच्या विवाह दिराशी लावून दिला 15 वर्षांनी पती घरी परतला.

Spread the love

मुलगा मयत झाल्याचे समजून केला होता अंत्यविधी, एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही स्टोरी
मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश):- आठ महिन्यांचे बाळ, पत्नी, भाऊ व आई-वडील असा गरीब, पण सुंदर परिवार सोडून एक प्रकाश तेलामी तरुण निघून गेला. भरकटत तो उत्तर प्रदेशला गेला अन् तिकडेच रमला.इकडे वाटेकडे डोळे लावून बसलेले कुटुंबीय थकले. पोलिसांनाही त्याला शोधण्यात यश आले नाही. कुटुंबीयांनीही त्याच्या परतीची आशा सोडली

व चिमुकल्याचा विचार करून त्याच्या पत्नीचे दिराशी लग्न लावून दिले. २५ ऑगस्टला अचानक तब्बल १५ वर्षांनी मुलगा घरी परतला अन् कुटुंबीयाला धक्काच बसला. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही स्टोरी चामोर्शी तालुक्यातील हळदवाही गावात उघडकीस आली. प्रकाश मनोहर तेलामी (३८, रा. हळदवाही) असे त्या तरुणाचे नाव १५ वर्षांपूर्वी तो अचानक आई वडील, पत्नी व ८ महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून गायब झाला.

इकडे कुटुंबीयांनी आदिवासी रिवाजाप्रमाणे अंत्यविधी केले. नातेवाइकांनी दुसरा मुलगा नंदेश्वर मनोहर तेलामी याच्यासोबत प्रकाशच्या पत्नीचा विवाह लावून दिला. त्यानंतर त्यांना एक मुलगा करण व मुलगी दर्पणा आहे. १५ वर्षांचा मोठा कालावधी लोटल्याने प्रकाशची पत्नी व भाऊ यांचा संसार सुरळीत सुरू होता, अशातच २५ ऑगस्टला प्रकाश घरी परतला.

मनपरिवर्तन झाल्याने परतला गावी…….
प्रकाश तेलामीने घर का सोडले होते याबद्दल तो काही सांगत नाही. पण तो चामोर्शीतून भटकत उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरातील गावदवळी (ता. बंगरा) गावी पोहोचला. तेथे एका शेतमालकाकडे कामाला राहिला. तो कामाच्या मोबदल्यात फक्त जेवण देत होता. आठ महिन्यांपूर्वी त्याने काम सोडले व दुसऱ्या शेतमालकाकडे काम सुरु केले. या कामाचे त्याच्याजवळ २० हजार रुपये साचले. मनपरिवर्तन झाल्याने गावी पोहोचलो.

हे पण वाचा

टीम झुंजार