जळगाव :- जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या रॅलीत दोन मोटारसायकलींची समोरासमोर धड़क होवून यात्रेत सहभागी झालेला भूवणेश दालूराम तेजारा ( वय १९, रा. केन्हाळा भोकरी, ता. रावेर, मुळ रा. राजस्थान) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (दि.१२) दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोचूर ते सावदा दरम्यान घडली.
या यात्रेनंतर भुवणेशची एनएसयूआयच्या अध्यक्षपदी निवड होणार होती, परंतु त्यापुर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मंगळवारी खिरोदा ते सावादा पर्वत जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये फैजपूर येथील धनाजी नाना चौधरी महाविद्यालयातील बीसीएचा द्वितीय वर्षांचा विद्यार्थी भुणेश चेजारा याच्यासह अन्य विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
रॅली खिरोदा येथून निघाल्यानंतर कोचूर ते सावदा दरम्यान भुणेश व त्याचा मित्र बुद्धभूषण हे जात असलेल्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील दुचाकीस्वारांसह मागे बसलेले देखील रस्त्यावर कोसळले. यात भुणेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दोन्ही विद्यार्थ्यांना रुग्णालयात हलवित असताना धडक देणाऱ्या दुचाकीचा चालकासह मागे बसलेली महिला तेथून निघून गेली.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






