एरंडोल :- विधानसभा मतदारसंघात उबाठाला मोठे खिंडार जि.प. मा.उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वरनाना आमले यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात जी विकास कामाची घौडदौड सुरू केली आहे.त्याला प्रेरित होऊन आज सायंकाळी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यालयावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

याप्रसंगी पं.स.मा.उपसभापती अनिलभाऊ महाजन, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील सर, मा.युवासेना तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळी सरपंच बाळासाहेब पाटील, बाम्हणे येथील मुकुंदा पाटील, पिंपळकोठा येथील छोटुभाऊ मराठे उपस्थित होते.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा