शिवसेना उबाठा गटाला मोठे खिंडार, माजी जि.प उपाध्यक्ष मा. ज्ञानेश्वर आमले यांच्या शिंदे गटात प्रवेश.

Spread the love

एरंडोल :- विधानसभा मतदारसंघात उबाठाला मोठे खिंडार जि.प. मा.उपाध्यक्ष मा.ज्ञानेश्वरनाना आमले यांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार चिमणराव पाटील यांनी मतदारसंघात जी विकास कामाची घौडदौड सुरू केली आहे.त्याला प्रेरित होऊन आज सायंकाळी आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यालयावर शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

याप्रसंगी पं.स.मा.उपसभापती अनिलभाऊ महाजन, पारोळा तालुकाप्रमुख मधुकरआबा पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील सर, मा.युवासेना तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळी सरपंच बाळासाहेब पाटील, बाम्हणे येथील मुकुंदा पाटील, पिंपळकोठा येथील छोटुभाऊ मराठे उपस्थित होते.

हे पण वाचा

टीम झुंजार