झाशी : अनैतिक संबंधातून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. झाशीमध्ये असंच एक प्रकरण उघडकीस आलं. सासऱ्याचे त्याच्या सावत्र सुनेशी अनैतिक संबंध होते.
ही गोष्ट सासूला कळली तेव्हा कुटुंबात वाद होऊ लागले. अखेरीस वादाला कंटाळून सासऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. झाशीतल्या टोडीफतेहपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबात नात्याची मर्यादा ओलांडणारी घटना घडली. सासऱ्याचे त्याच्या सावत्र सुनेशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपूर्वी या दोघांना सासूने आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं होतं.
हे अनैतिक नातं उघड झाल्यावर कुटुंबात वाद होऊ लागले. अखेरीस वादाला कंटाळून सासऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांची प्रकृती बिघडताच कुटुंबीय त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन गेले. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमॉर्टेम हाउसमध्ये सासूने या प्रकरणाबाबत सांगितलं की, ‘सासरी आल्यानंतर सून भांडणं करू लागली. त्यामुळे मुलगा दिल्लीला नोकरीसाठी निघून गेला. यादरम्यान माझ्या पतीचे आणि सुनेचे अनैतिक संबंध निर्माण झाले. या संबंधांना दोघांची सहमती होती. सासरा आणि सून एकत्र बसून मद्यपानही करायचे. रोज सून मला झोपेच्या गोळ्या देत असे. जेव्हा मी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं तेव्हा मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. सून सासऱ्यासोबत राहू इच्छित होती.’
टोडीफतेहपूर परिसरातल्या एका गावातल्या या व्यक्तीच्या पत्नीचं सुमारे वीस वर्षांपूर्वी निधन झाले. त्याने गाता गावातल्या एका विधवा महिलेशी दुसरा विवाह केला. त्या महिलेला तेव्हा पाच वर्षांचा एक मुलगा होता. हा मुलगा मोठा झाल्यावर त्याचा विवाह करण्यात आला. कुटुंबानं दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर मुलगा कामासाठी दिल्लीला निघून गेला. गेल्या तीन वर्षांपासून सून तिच्या सासू-सासऱ्यांबरोबर राहत होती. दरम्यान तिचे सासऱ्यांशी अनैतिक संबंध निर्माण झाले. शेजाऱ्यांनी सासूला याविषयी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी सासूने या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं होतं.
त्यानंतर तिघांमध्ये जोरदार भांडण झालं. नाराज होऊन सासू माहेरी निघून गेली. तिने ही गोष्ट मुलाला सांगितली. तोदेखील दिल्लीवरून घरी परतला. अनैतिक संबंध उघड झाल्यानं तिघांमध्ये जोरदार भांडण झालं. शनिवारी सासरा खूप दारू प्यायला. त्यानंतर त्याने घरी येताच विष प्राशन केलं. विष प्राशन केल्याचं त्यानं पत्नीला सांगितलं. बाकीच्या व्यक्ती घरी पोहोचेपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. कुटुंबीय त्याला मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन गेले; पण रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पोस्टमॉर्टेम झाल्यावर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
हे पण वाचा
- VIDEO: कुटुंबानं खरंच यमराजाला दिला चकवा!काच फोडून कारमध्ये शिरल्या लोखंडी सळ्या; पहा नशीब अन् कर्मावर विश्वास बसणार नाही असा व्हिडिओ.
- नवरदेव आला मंडपात, इतक्यात नवरीचा वडिलांनी तिच्या मृत्यूची बातमी सांगितली,नवरदेवाला आला संशय अन् हादरवणारे सत्य आलं समोर.
- बाबागिरी करणाऱ्या मौलवीने 17 वर्षीय निष्पाप मुलाची निर्घुण हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून दुकानात पुरले,साडे चार वर्षानी गुढ उकललं.
- दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.
- पती खूनाच्या आरोपात अटकेत त्याला वाचवण्याच्या नादात पत्नीनं भलतचं केलं, पोलिसांवर केलेल्या गंभीर आरोपात तीन पोलिस निलंबित,काय आहे प्रकरण.