दोन मुलांची आई प्रियकराच्या प्रेमात आंधळी, पत्नीने प्रियकराला बोलवले घरी दोघांना सोबत पाहून पतीची तळपायाची आग मस्तकात गेली, मग पुढे सुरू झाला हायहोल्टेज ड्रामा.

Spread the love

अमेठी :- पती-पत्नीचा सुखाचा संसार सुरू होता. त्यांना दोन मुलं होती. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण सोशल मीडियाच्या या युगात कुणाचा मनावरील ताबा केव्हा सुटेल हे सांगता येत नाही. या प्रकरणातही झाले तसेच दोघांमध्ये तिसऱ्याची एंट्री झाली.पतीने पत्नीला समजावून सांगितले. पण ती तर प्रियकराच्या प्रेमात आंधळी झाली होती. एका रात्री तो दोन वाजता उठला. तेव्हा पत्नी शेजारी दिसली नाही. तो हॉलमध्ये आला तेव्हा त्याचा संशय खरा ठरला. पत्नी प्रियकरासोबत त्याला दिसली आणि मग पुढे हायहोल्टेज ड्रामा झाला.

मग बोलावले पोलीस……

उत्तर प्रदेशातील अमेठी पोलीस ठाण्यातंर्गत ही घटना घडली. या भागातील एका घरात उत्तर रात्री एका घरात मोठा तमाशा झाला. पती रात्री दोन वाजता उठला असता त्याला पत्नी जवळ दिसली नाही. त्याने अंदाज घेतला. तो पुढच्या हॉलमध्ये आला असता, त्याची बायको शेजारच्या तरुणासोबत त्याला दिसली. त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने दोघांना शिव्या घातल्या. दोघे आपल्याला मारून टाकतील या भीतीने त्याने दरवाजा बंद करत पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलावले. त्याने शेजार्‍यांना सुद्धा रात्री कॉल करून बोलावले. रात्री एकच गजहब उडाला.शेजाऱ्यांनी गर्दी केली. तितक्यात पोलीस आल्यानंतर पतीने घराचा दरवाजा उघडला. एकच चर्चा सुरू झाली. पोलीसांनी परिस्थिती पाहता तिघांना जीपमध्ये बसवून पोलीस ठाण्यात नेले. तिथे चर्चा झाली. पत्नीने तिचे शेजाऱ्याच्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले. तसेच ती पतीच्या नकळत रात्री-अपरात्री त्याला भेटत असल्याचे मान्य केले. इतकेच नाही तर प्रियकरामुळे तिला गर्भधारणा पण झाल्याचे तिने सांगितले. हे कळताच सगळ्यांना एकदम झटका बसला.

मग पुढे झाले काय…..

पत्नी, प्रियकरापासून गर्भवती असल्याचे समोर येताच पती मटकन खाली बसला. दोघात काही समेट घडेल याची सर्व शक्यता संपून गेल्या. पतीने तात्काळ पत्नीला सोडण्याचा निश्चय जाहीर केला. पतीने पत्नीला घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला. शेजार्‍यांनी सुद्धा त्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. त्यानंतर पत्नी प्रियकरासोबत गेली. पतीने दोन्ही मुलांचा सांभाळ करणार असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईलचा अति वापर आणि नात्यातील संवाद हरवल्याने असे प्रकार वाढत असल्याचे म्हटले आहे.

मुख्य संपादक संजय चौधरी