जामनेर (प्रतिनिधी) :- कासोदा येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ.महानंदा भावराव पाटील यांनी बनावट जन्मादेश दाखला सादर करून सेवेचे वर्ष वाढवून शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी जामनेर न्यायालयाने त्यांना ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठवली आहे.याबाबतचे सविस्तर असे की, कासोदा ता. एरंडोल येथील सार्वजनिक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.महानंदा भावराव पाटील या नियम व वयोमानानुसार सन २०१५ मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या परंतु त्यानंतरही त्यांनी सेवेत कायम हजर राहून शासकीय लाभ प्राप्त करण्याच्या गैरहेतूने प्रतिज्ञा पत्रात जाणीवपूर्वक खोटी जन्मतारीख नमूद केली होती,
सदर जन्म दाखला त्यांनी जामनेरचे तत्कालीन कार्यकारी दंडाधिकारी यांची दिशाभूल करून खोटी कागदपत्रे सादर करून प्राप्त केला होता.या प्रकरणी शिक्षण संस्थेने येथील तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची सुनावणी तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती.या गंभीर गुन्ह्याची सुनावणी आज जामनेर न्यायालयासमोर झाली, सदर प्रकरणात सरकारी वकील ॲड. सौ. कृतिका भट यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष घेतली यात नरेंद्र भिकनराव पाटील यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.
आरोपीने केलेला गुन्हा हा आर्थिक स्वरूपाचा व गंभीर असून शासनाची दिशाभूल करणारा आहे असा जोरदार व्यक्तिवाद सरकारी वकिलांनी केला,हा युक्तिवाद ग्राह्य धरून जामनेर न्यायालयाने मुख्याध्यापिका सौ.महानंदा भावराव पाटील यांना दोषी धरत ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. न्या.दि.न चामले यांचे न्यायासनासमोर सदर घटला चालला,खटल्यात सरकारी वकील म्हणून ॲड. रवींद्रसिंह देवरे व ॲड.अनिल सारस्वत यांनीही काम पाहिले तर त्यांना ॲड. प्रसन्न पाटील यांनी मदत केली. तपास अधिकारी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिरसाठ होते तर न्यायालयात पैरवि अधिकारी म्हणून पो.हे.कॉ चंद्रकांत बोदडे व पोलीस कॉन्स्टेबल निलेश सोनार यांनी मदत केली.सरकार पक्षास अँड प्रसन्न पाटील यांनी मदत केली.
हे पण वाचा
- VIDEO : नवऱ्यांच्या त्रासाला कंटाळून दोन बायका इन्स्टावर पडल्या एकमेकांच्या प्रेमात; पळून जाऊन केलं मंदितरात लग्न.
- माझ्या आयुष्यात पाच ते सहा महिन्यात जे घडलं आहे ते सत्य तुमच्यासमोर मांडून आयुष्य संपवत आहे; सोशल मीडियावर पोस्ट करत एकतर्फी प्रेमातून तरुणाने संपवलं जीवन.
- वैद्यकीय सेवेसाठी कायम सहकार्य:-पालकमंत्री गुलाबराव पाटील; पालकमंत्र्यांचा डॉक्टर असोसिएशन मार्फत सत्कार
- अमळनेर येथे एमपीडीएतून सूटलेल्या,गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यावर अज्ञात व्यक्तिंनी लाठ्या काठ्यांनी केला जीवघेणा हल्ला.
- भडगांव महसुल विभागाची धडक कारवाई; अवैध वाळू चोरी करून वाहतुक करतांना २ डंपर जप्त