यावल तहसील कार्यालयात शिक्षकांचे निवेदन, जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पेन्शन जनक्रांती महामोर्चा चा इशारा

Spread the love

यावल :- येथील तहसील कार्यालयामध्ये यावल तालुक्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनीएकत्र येत निवेदन दिले व जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी दिनांक १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधानभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चा आंदोलन नेण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे त्यांनी दिला आहे.
यावल येथील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे यावल तालुक्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येत निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्षापासून ०१ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची मागणी राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांद्वारे केली जात आहे.

यासाठी विविध आंदोलने, मोर्चे, धरणे आंदोलन, उपोषण करण्यात आले. तसेच मागील वर्षी नागपूर येथील राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात २७ डिसेंबर रोजी दीड लाख हुन अधिक कर्मचाऱ्यांनी पेन्शन संकल्प यात्रा काढून राज्य शासनाच्या जुन्या पेन्शन विषयक नाकारात्मक धोरणाचा निषेध केला होता. त्यानंतरच्या काळात मार्च २०२३ मध्ये राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती. त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते.

मात्र, आता सहा महिने उलटले तरी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. शासनाच्या या फसव्या आश्वासनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शासन विषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. म्हणून आता येत्या नागपूर येथील राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन काळात दिनांक १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे विधानभवनावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात पेन्शन जनक्रांती महामोर्चा आंदोलन केले जाणार आहे यात लाखो कर्मचारी एकत्र येऊन जुनी पेन्शन विषयक शासनाच्या उदासीन धोरणाचा निषेध करणार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

सदरचे निवेदन शिक्षक संघटनेचे खेमचंद खाचणे, मनोज करांडे, आरिफ तडवी, श्रीकांत माटे, कपिल पाटील, राजेश महाजन, धनंजय काकडे, सलीम तडवी, पंढरीनाथ महाले, तनुजा काकडे, सविता वारके, प्रकाश चमकारे, सलीम तडवी, संदीप केदारे, योगेश नेहते, मनोज पाटील, संदीप पाटील, गिरीश महाजन, प्रशांत बाविस्कर, शबाना तडवी, ज्योत्ना शिरसागर सह मोठ्या संख्येत शिक्षकांची निवेदन देते प्रसंगी उपस्थिती होती.

टीम झुंजार