सर्व रूग्णांवर तात्काळ व मोफत उपचार करण्याच्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सूचना
जळगाव : – पारोळा तालुक्यातील शिवरे गावात आज शेतातील अशुद्ध पाणी पिल्याने २९ मजूरांना विषबाधा झाली. सर्व रूग्णांवर पारोळा कॉटेज रूग्णालय यशस्वी उपचार सुरू आहेत. सर्व रूग्णांची प्रकृती चांगली आहे. शिवरेदिगर ता.पारोळा येथील २९ नागरिकांना शेतातील पाण्यातुन विषबाधा झाली. या विषबाधेत अगदी लहान्यांपासुन तर थोरल्यांचा समावेश आहे. या सर्व विषबाधा झालेल्या रूग्णांना तातडीने कुटीर रूग्णालय पारोळा येथे आणण्यात आले. या घटनेची माहीती मिळताच आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी कुटीर रूग्णालय गाठले. या ठिकाणी दाखल रूग्णांची आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी स्वतः विचारपुस करून उपचाराबाबत माहीती घेतली.

यावेळी सर्व आवश्यक त्या सोयी-सुविधा व उपचारास कुठलाही विलंब व दिरंगाई न करता तातडीने सर्वोतोपरी प्रयत्न करा व रूग्णांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या. यातील विषबाधेने अतिबाधित असलेल्या रूग्णांना तातडीने पुढील उपचाराची सोय करून द्या, तसेच वरिष्ठ पातळीवर कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होता असल्यास मला कळवा. उपचारासाठी वाहन, औषधी यांसह आवश्यक बाबींची कमतरता भासल्यास ते देखील आपणांस उपलब्ध करून देण्याचे यावेळी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, गटविकासअधिकारी विजय शिंदे, पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी, पत्रकार, रूग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत घटनेची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. रूग्णांवर तात्काळ मोफत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा गटविकास अधिकारी किशोर शिंदे व तालुका गटविकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना तात्काळ सूचना निर्गमित केल्या.
घटनेचे गांभीर्य ओळखत गटविकास अधिकारी किशोर शिंदे घटनास्थळी पोहचत परिस्थितीचा आढावा घेतला. शिवरे गावात मध्यप्रदेश हून शेतमजूरीसाठी आलेल्या या २९ जणांनी शेतातील एका ड्रममध्ये अनेक दिवसापासून साचलेले पाणी पिल्याने विषबाधा झाली असावी असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. २९ जणांपैकी २ जणांवर तामसवाडी आरोग्य केंद्रावर उपचार चालू आहेत. गावातील पाणी नमुने आरोग्य सेवकांनी घेतले आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






