दिंडोरी :- शहरात सिध्दार्थ नगर येथे दोघांमध्ये सुरू असलेलं भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तिसऱ्याला छातीवर फायटरने मारल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला.दोघांमधील वाद तिसऱ्याला एवढा महागात पडला.ही घटना सिद्धार्थनगरमध्ये मंगळवारी (ता.५) रात्री घडली. यात योहान बन्सी वारडे (३८) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकास अटक केली.

याबाबत संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्दार्थनगर येथे बाळू मागाडे यांच्या घरासमोर ही घटना घडली. बाळू मागाडे आणि मयूर अहिरे यांच्यात काही कारणावरून बाचाबाची झाली, त्याचे रूपांतर भांडणात झाले, वाद वाढत चालल्याने तो सोडविण्यासाठी योहान हा गेला.तू का मध्ये पडतो म्हणून रागाच्या भरात मयूर अहिरे याने योहानच्या छातीवर फायटरने मारले.
जोरदार ठोसा बसल्यावर योहानला त्रास सुरू झाला. योहानला हृदयविकाराचा त्रास असल्याने काही तासांतच हृदयाचा त्रास वाढला आणि त्याचा मृत्यू झाला. योहानचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात गर्दी जमली व तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. नातेवाइक आक्रमक झाले होते. मृतदेह पोलिस ठाण्यासमोर ठेवून खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.