पारोळा :- आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोलदादा पाटील यांनी मतदारसंघात सुरू केलेली विकासगंगा, सभोवतालील गावांचा होत असलेला विकास व मतदारसंघाचा सर्वांगिण विकासासाठी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.अमोलदादा पाटील यांची दुरदृष्टी हे पाहता आज शिरसमणी ता.पारोळा येथील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य, मा.सरपंच, उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.अमोलदादा पाटील यांचा नेतृत्वावर विश्वास ठेवत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यासमयी शिरसमणी सरपंच विजय भास्कर पाटील, उपसरपंच भिमराव नरसिंग वंजारी, ग्रामपंचायत सदस्य शिवम पवार, दादाभाऊ पाटील, सुभाष वंजारी, गोरख भिल, स्वप्निल बोरसे, संभाजी भावराव पाटील यांचा आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील व मा.अमोलदादा पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करून घेतला. याप्रसंगी युवासेना तालुकाप्रमुख राकेशदादा पाटील, दळवेल सरपंच प्रविणआण्णा पाटील, शेतकी संघाचे मा.सदस्य दासभाऊ पाटील, चेतन पाटील, भोंडणदिगर मा.सरपंच भैय्यासाहेब पाटील, आडगांव सरपंच महेश मोरे, म्हसवे मा.उपसरपंच साहेबरावदादा पाटील, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.
हे पण वाचा
- वावडदे येथे डिजिटल बँकिंग व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन
- जामनेर तालुका दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
- अखेर सुलेमानच्या मृत्यू नंतर अनधिकृत कॅफेंवर पोलीस प्रशासनाची टाळे बंद कारवाई/नगर परिषद प्रशासन अनभिज्ञ आहे काय?
- जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द येथील तरुणाचा टोळक्याच्या जीवघेण्या मारहाणीत मृत्यू
- जागतिक आदिवासी दिनानिमित्त जामनेर तालुक्यात योजना मार्गदर्शन व वृक्षारोपण कार्यक्रम