फैजपूर :- पोलिसांनी गुटखा वाहतुकीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई केली असून सुमारे 83 लाखांचा दोन आयशर भरून गुटखा जप्त करण्यात आल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या असून मुख्य म्होरक्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. गोपनीय माहितीवरून कारवाई फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांना बर्हाणपूरकडून फैजपूरकडे गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कर्मचार्यांसह बुधवार, 10 रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचला.
आमोदा गावाजवळील हॉटेल कुंदनजवळ आयशर क्रमांक (एम.एच.19 सी.वाय.9364 व एम.एच.19 सी.एक्स.0282) आल्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणण्यात आली. पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली 83 लाख सहा हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला तर 34 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून एकूण एक कोटी 17 लाख सहा हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (33, कोडगाव, ता.चाळीसगाव, ह.मु.शास्त्रीनगर, चाळीसगाव), जयेश सुभाष चांदेलकर (33, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (29, रामेश्वर कॉलनी, जळगाव) व मंगेश सुनील पाटील (31, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) यांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही आयशर वाहनामागे टाटा हॅरीअर ही गाडी पोलिसांवर लक्ष ठेवून असल्याने या गाडीतील चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे तर हा गुटखा आपला असल्याचा दावा पाटील यांनी केल्याचे समजते.
हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.यांनी केली कारवाईही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मैन्नूदीन सैय्यद, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार गोकुळ तायडे, हवालदार विकास सोनवणे, हवालदार उमेश चौधरी, सहाय्यक फौजदार देविदास सुरदास, चालक अरुण नमायते आदींच्या पथकाने केली
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






