CCTV Video: दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रोजच्या प्रवासातही महिलांना वाईट अनुभव येत आहेत. अशात तरुणींनी निर्भय होत अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं.असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये घडला. मिरजेत छेड काढणाऱ्या तरुणाची तरुणीने भररस्त्यात धुलाई केली. या तरुणाला कपडे फाटेपर्यत तरुणीने चोप देत धिंड काढत फरफटत थेट पोलीस ठाण्यात आणले. छेडछाड केल्याप्रकरणी मारहाण केल्याची सर्वंत्र चर्चा होत आहे. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
काय आहे प्रकरण?
आज सकाळी एका तरुणीने रोडरोमिओची भररस्त्यात मारहाण करत पोलीस स्टेशनपर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. भर रस्त्यावर मारहाण करत तरुणाला धडा शिकवणाऱ्या या तरुणीचं कौतुकही होत आहे. आरोपी तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार आहे. त्याने या तरुणीचा छेड काढल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. छेड काढल्याने संतापलेल्या तरुणीने तिथेच तरुणाला मारायला सुरुवात केली. पोलीस स्टेशनपर्यंत तरुणाला मारहाण करीत त्याची धिंड काढली. हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्यावर लावण्यात आलेल्या सी.सी.टीव्ही मध्ये कैद झाला आहे. मिरज शहर पोलीस ठाणे येथे सदर प्रकरणाची अद्याप तरी नोंद झाली नसल्याचे समजते. परतु, या घटनेने टवाळखोर तरुणांवर या घटनेने जबर वचक बसणार आहे.
मुलाचे प्रेमप्रकरणात बापाला मारहाण
शिराळा तालुक्यामधील मांगलेमध्ये प्रेमसंबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या बेदम मारहाणीत मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दादासाहेब चौगुले असं मृत बापाचे नाव आहे. दादासाहेब यांच्या मुलाचे त्यांच्याच गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले होते. याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता. दरम्यान दादासाहेब चौगुले हे सकाळी त्यांच्या शेताकडे गेले होते. त्यावेळी मुलीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले. आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे, ते कोठे आहेत सांगा असे म्हणून दादासाहेब चौगुले यांना विजेच्या खांबाला दोरीने बांधून बेदम मारहाण केली. यात त्या दादासाहेब यांचा मृत्यू झाला आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






