धरणगाव;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लग्न करण्यासाठी पळून जाण्याची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धरणगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत असून १७ मार्च २०२२ पासून याच परिसरात राहणारा प्रविण जगतराव पाटील याने पिडीत मुलीला पाठलाग करून तिला लग्न करण्यासाठी माझ्यासोबत पळून जावू असे सांगितले.
त्यानंतर पिडीत मुलीने याला नकार दिल्यावर तिला बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर रविवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी प्रविण पाटील हा पिडीत मुलीच्या घरासमोर येवून बोलण्यासाठी जबरदस्ती करत असतांना तिचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीसह तिच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता संशयित आरोपी प्रविण पाटील याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






