जळगाव : उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णता व गर्मी वाढली आहे. यामुळे घराघरात कुलरचा वापर देखील वाढला आहे. अशाच प्रकारे दुपारच्या सुमारास कुलर सुरु करताना विजेचा जोरदार झटका बसून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील किनोद या गावी घडली. किनोद (ता. जळगाव) येथे आई व दोन बहिणींसह वास्तव्यास असलेली अक्षदा किशोर मोरे (वय १२) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने घरामध्ये लावलेला पत्र्याचा कुलर सुरू करण्यासाठी अक्षदा ही गेली.
तिने कुलर सुरु करण्यासाठी बटन सुरू करत असताना तिला विजेचा जोरदार धक्का लागल्याने ती फेकली गेली. घरात असलेल्या तिच्या आईला हा प्रकार दिसताच तिने आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर अक्षदाला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. येथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- टी२० विश्वविक्रम: एकाच संघाच्या ११ जणांनी गोलंदाजी करत रचला विश्वविक्रम,जगात घडले पहिल्यांदाच तर हार्दिक पांड्याच्या ६ चेंडूंत २८ धावा
- जळगावात भरदिवसा घरफोडी करणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. ३० नोहेंबर २०२४
- दुर्दैवी घटना! घरात विवाह सोहळ्याची जय्यत तयारी, एकुलत्या एक मुलाच्या हळदीच्या दिवशीच आईने घेतला जगाचा निरोप.
- एस.टी. बसमधून प्रवास करणार्या महिला प्रवाशाच्या अडीच लाखांच्या दागिन्यांवर एस.टी.चालकाचा डल्ला, पोलिसी खाक्यानंतर दिली कबुली.