जळगाव : उन्हाळ्याचे दिवस असल्याने उष्णता व गर्मी वाढली आहे. यामुळे घराघरात कुलरचा वापर देखील वाढला आहे. अशाच प्रकारे दुपारच्या सुमारास कुलर सुरु करताना विजेचा जोरदार झटका बसून १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील किनोद या गावी घडली. किनोद (ता. जळगाव) येथे आई व दोन बहिणींसह वास्तव्यास असलेली अक्षदा किशोर मोरे (वय १२) या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. उन्हामुळे दुपारी गरम होत असल्याने घरामध्ये लावलेला पत्र्याचा कुलर सुरू करण्यासाठी अक्षदा ही गेली.
तिने कुलर सुरु करण्यासाठी बटन सुरू करत असताना तिला विजेचा जोरदार धक्का लागल्याने ती फेकली गेली. घरात असलेल्या तिच्या आईला हा प्रकार दिसताच तिने आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिक धावून आले. यानंतर अक्षदाला जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. येथे तपासणी करून वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- गावा- गावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट;१२ दिवसांत १२१ गावांत शिवसेनेच्या धनुष्याचा डोर- टू – डोर जयघोष
- डॉ.संभाजीराजे पाटील यांचा वाढत्या प्रतिसादेला जनतेचा भक्कम पाठिंबा
- अपक्ष उमेदवार डॉ हर्षल मानेच्या प्रचारात सौभाग्यवतींनी घेतली प्रचारात आघाडी; गावोगावी महिला औक्षण करुन देत आहे विजयी होण्याच्या आशीर्वाद.
- गुलाबभाऊंच्या “धनुष्यबाणाला” प्रचंड मतांनी विजयी करा, माजी सभापती ललिताताई कोळी यांचे आवाहन
- अमळनेर येथे दुचाकीवरून साडे तीन किलो गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद, १ लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त.