जळगाव : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दिपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) ही आठ महिन्याची गर्भवती महिला जागीच ठार झाली. तिचे पती व तीन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले.ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरवले आहे.जूना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहे. ते पत्नी दिपाली व तीन वर्षाची मुलगी काव्या हीला घेवून निमगव्हाण येथे नातेवाईकांकडे भेटण्यासाठी गेले होते.
तेथून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९, सीएफ ९७९७) वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्याची गर्भवती असलेल्या दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघ गंभीर जखमी झाले.अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






