जळगाव : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे दिपाली योगेश कोळी (२२, रा. जुना असोदा रोड, जळगाव) ही आठ महिन्याची गर्भवती महिला जागीच ठार झाली. तिचे पती व तीन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले.ही घटना रविवार, १२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास वराड गावाजवळ घडली. मातृदिनीच गर्भवती महिलेवर काळाने झडप घातल्याने एकाच वेळी दोन जीव गेले तर तीन वर्षीय मुलीचे मातृछत्र हरवले आहे.जूना असोदा रोड परिसरात योगेश गुलाब कोळी (२८) हे खासगी वाहनावर चालक म्हणून नोकरीस आहे. ते पत्नी दिपाली व तीन वर्षाची मुलगी काव्या हीला घेवून निमगव्हाण येथे नातेवाईकांकडे भेटण्यासाठी गेले होते.
तेथून घरी परतत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने (क्र. एमएच १९, सीएफ ९७९७) वराड गावाजवळ दुचाकीस्वार दाम्पत्याला जोरदार धडक दिली. या अपघातात आठ महिन्याची गर्भवती असलेल्या दिपाली यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती योगेश व मुलगी काव्या हे दोघ गंभीर जखमी झाले.अपघातात महिला जागीच ठार झाल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
हे पण वाचा
- 26 वर्षीय महिला शिक्षिकेने लग्नास नकार दिल्याने, हताश झालेल्या 30 वर्षीय युवकाने शाळेच्या आवारातच महिला शिक्षिकेची केली हत्या!
- दुर्दैवी घटना! पोलीस सर्व्हिसचे प्रशिक्षण पूर्ण करुन पहिल्याच पोस्टिंगसाठी जाताना गाडीचे टायर फुटल्याने IPS अधिकाऱ्याच्या मृत्यू.
- सावदा येथे सराफ दुकानास आग; आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
- हजारो भाविकांच्या उपस्थितीत नथ्थू बापुंना चढवली भगवी चादर; पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम.
- धक्कादायक! गेल्या चार वर्षांपासून पोलीस चौकीत हवालदार म्हणून तैनात, सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह, वसुली सुरू, अन् एके दिवशी असा झाला पर्दाफाश.