जालना:- एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिल्ह्यातील शिंगाडे पोखरी हद्दीत एका प्रेमी युगुलानं गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार हे दोघेही छत्रपती संभाजीनगर येथील रांजनगावमधील रहिवासी आहेत. कैलास काशिनाथ गवई आणि मुक्ता रामेश्वर खंडागळे अशी आत्महत्या केलेल्या जोडप्याचं नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस ताडडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातल्या शिंगाडे पोखरी हद्दीत एका प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेतल्याची घटना घडली आहे. कैलास काशिनाथ गवई आणि मुक्ता रामेश्वर खंडागळे अशी मृतांची नावं आहेत. ते दोघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.हे दोघेही आपल्या दुचाकीवर आले होते. त्यानंतर तालुक्यातील शिंगाडे पोखरी पाटीजवळ त्यांनी रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावली आणि दोघांनीही झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मोजपुरी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला, पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






