अहमदनगर:- श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथील ४० वर्षीय वयातील महिलेला तिचा गावातील प्रियकर राजेंद्र जगनाथ देशमुख व त्याचा साथीदार बिभीषण सुरेश चव्हाण (रा. बाभळगाव, ता. इंदापूर, जि.पुणे) यांनी सातारा येथे घेऊन जात तेथे तिचा गळा आवळून खून केला.तसेच खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी नजीकच्या कालव्यात मृतदेह फेकून दिला. या घटनेनंतर पाच ते सहा दिवसांतच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत दोघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. २९ मे रोजी ही खुनाची घटना घडली होती.
राजेंद्र देशमुख याचे गेल्या पाच महिन्यांपासून सदर महिलेशी प्रेमसंबंध होते. सदर महिला राजेंद्र याला सोबत राहण्याचा हट्ट करत होती. त्यामुळे राजेंद्र याने बिभीषण चव्हाण याच्या तिचा खून करण्याचा कट रचला. २९ मे रोजी हे दोघे तिला सातारा परिसरात घेऊन गेले. तेथे त्यांची पुन्हा वादावादी झाली आणि त्याच ठिकाणी दोघा आरोपींनी महिलेचा गळा आवळून खून करत मृतदेह कालव्यात फेकून दिला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत.
मंगळसुत्रामुळे फुटली वाचा
मृत सुभद्राच्या गळ्यात श्रीगोंदा येथील सराफाचा शिक्का असलेले मंगळसूत्र होते. मंगळसुत्रावरील शिक्का पाहून सातारा पोलिसांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधला व श्रीगोंदा पोलिसांनी स्थानिक ठिकाणी चौकशी करून दोघा आरोपींना अटक केली.
हे पण वाचा
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






