रावेर :- तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन ठिकाणी गुरांची चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. निंभोरा पोलीसांनी परिसरातील ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून गुरांची चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलीसांनी मध्यप्रदेशातून तुकाराम रूमालसिंह बारेला, रा. बोरी जि. बऱ्हाणपूर, धर्मेंद्र दुरसिंग बारेला रा. ढेरीया जि. खंडवा, शांताराम बिल्लरसिह बारेला रा. हिवरा जि. बऱ्हाणपूर, सुभाष प्रताप निंगवाल रा. दहिनाला जि. बऱ्हाणपूर आणि मस्तरीराम काशीराम बारेला रा. न्हावी ता. रावेर यांना अटक केली.
त्यांच्याकडून ११ म्हशी, २ बोलेरो, १ दुचाकी असा एकुण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता टोळीने निंभोरा, फैजपूर, मुक्ताईनगर, रावेरसह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड, मध्यप्रेदशातील पंधाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून देखील गुरांची चोरी केल्याची निष्पन्न झाले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी ६ वाजता दिली.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.