रावेर :- तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन ठिकाणी गुरांची चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. निंभोरा पोलीसांनी परिसरातील ६० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करून गुरांची चोरी करणारी टोळी ही मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलीसांनी मध्यप्रदेशातून तुकाराम रूमालसिंह बारेला, रा. बोरी जि. बऱ्हाणपूर, धर्मेंद्र दुरसिंग बारेला रा. ढेरीया जि. खंडवा, शांताराम बिल्लरसिह बारेला रा. हिवरा जि. बऱ्हाणपूर, सुभाष प्रताप निंगवाल रा. दहिनाला जि. बऱ्हाणपूर आणि मस्तरीराम काशीराम बारेला रा. न्हावी ता. रावेर यांना अटक केली.
त्यांच्याकडून ११ म्हशी, २ बोलेरो, १ दुचाकी असा एकुण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांची अधिक चौकशी केली असता टोळीने निंभोरा, फैजपूर, मुक्ताईनगर, रावेरसह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड, मध्यप्रेदशातील पंधाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतून देखील गुरांची चोरी केल्याची निष्पन्न झाले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी सायंकाळी ६ वाजता दिली.
हे पण वाचा
- प्रेम संबंधांत अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने दारू पाजली,अन् स्वत:च्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं.
- तिसऱ्यांदा मुलगी झाल्याचा राग आला म्हणून नराधम पतीने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवले, पेटलेल्या अवस्थेत धावली रस्त्यावर पण……
- मैं तेरे प्यार में पागल! ६ मुलांची आई पडली भिकाऱ्याच्या प्रेमात, घरातून रोख रक्कम घेवून भिकाऱ्यासोबत पळाली; पतीची पोलिसात तक्रार दाखल.
- Video:पत्रिका छापल्या, मंडप सजला नवरी म्हणाली, ‘माझं दुसऱ्यावर प्रेम आहे’, बापानं अन् भावानं गावासमोरच लेकीवर धाडधाड गोळ्या घातल्या ठार केल.
- Viral Video: लग्नादरम्यान अचानक वराचा मित्र स्टेजवर पोहोचला, वराच्या कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; पहा धक्कादायक व्हिडिओ.