अकोला :- जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. काळेगाव येथे कुलरमधून विजेचा जोरदार धक्का लागल्याने दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी २३ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.ईशानी प्रवीण ढोले (वय-४) आणि प्रियांशी सोपान मेतकर (वय-५) असं दुर्दैवी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकारच्या घटना सतत घडत असलेल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नेमकं काय घडल?
अकोला जिल्ह्यातील काळेगाव येथे उन्हाळ्याची सुट्टी असल्याने दोन मुली आपल्या मामाच्या घरी आल्या होत्या. रविवारी दुपारी त्या दोन्ही चिमुकल्या घरात खेळत होत्या. त्यावेळी घरात कुलर सुरू होता. या कुलरला त्या दोन मुलींचा नकळत स्पर्श झाला. या कुलरमध्ये विजेचा प्रवाह उतरला होता. त्यावेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला.
या घटनेत दोन्ही मुलींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.