सातारा :- जिल्ह्यातील वडूथ येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह सापडला आहे. कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेली महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील आहे. येथे संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) नावाची एक महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते. याच महिलने शनिवारी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह कृष्णा नदीत उडी मारली आहे.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, शोधमोहिमेला अडचण
महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याचे समजताच या परिसरात एकच खळबळ उडाली. कृष्णेच्या पात्रात सध्या शोधमोहीम चालू आहे. दोन वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या नदीची पाणीपातळी तब्बल 40 फुटांवर पोहोचली आहे. असे असताना पाण्याच्या प्रवाहात या महिलेचा शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत. भविष्यातही कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. असे असताना या महिलेचा शोध घेण्यात यश येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
महिलेने नदीत उडी का घेतली?
कृष्णा नदीच्या पात्रता उडी घेतलेली ही महिला काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मात्र आता या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह नदीत उडी घेतली. या घटनेचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या महिलेचा शोध घेतला जात आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






