वसई :- फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीकडे असलेल्या बेडीच्या चावीने नकली पोलिसाचे बिंग फुटले. आरोपी नकली पोलीस बनून वावरत होता. त्याच्याकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र आणि इतर वस्तू आढळून आल्या.वसईतील महेंद्रकुमार पुरोहीत या फिर्यादीचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून काही दिवसांपूर्वी एका ठकसेनाने १ लाख ६० हजारांचा मोबाईल फोन विकत घेतला होता. या ठकसेनाने दुकानदाराची फसवणूक करण्यासाठी १ लाख १० हजाराांची रक्कम बॅंकेत एनईफटीद्वारे ट्रान्सफर केल्याचे भासवले आणि तसा एडीट केलेला खोटा मेसेज दाखवला. तसेच ५० हजारांचा बनवाट धनादेश दिला होता. दुकानदाराच्या नंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने वालीव पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
..आरोपीच्या हातातील की चेनमुळे फुटले बिंग
वालीव पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपी फैजुल अबू हसन शेख (२८) याला अटक केली. त्याची चौकशी सुरू असताना त्याच्या हातात असलेल्या चावीला बेडी असलेली की चेन दिसली. त्यामुळे पोलिसांनी कुतूहलापोटी बेडी असलेल्या कि-चेनचा तपास केला असता धक्कादायक माहिती मिळाली. आरोपीकडे पोलिसांचे गणवेश, बनावट ओळखपत्र, नियुक्ती पत्रे, पोलीस वापरतात तशा एकूण ३० वस्तू आढळून आल्या. त्यामुळे तो नकली पोलीस बनून वावरत असल्याचे निष्पन्न झाले.
मला पूर्वी पोलीस बनवायचे स्वप्न होते. मात्र ते पूर्ण न झाल्याने तो पोलीस बनून वावरत असल्याचा दावा आरोपीने केला आहे. मात्र त्याने पोलीस बनून फसनवणुकीचे गुन्हे केले असल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करत असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.आरोपीने यापूर्वी देखील अशाच पद्धतीने बनावट धनादेश देऊन एक दुचाकी घेतली होती. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानर, मुकेश पवार, मनोज मोरे, किरण म्हात्रे, सचिन दोरकर, सतीश गांगुर्डे, बाळू कुटे आदींच्या पथकाने या नकली पोलिसाला अटक केली.
हे पण वाचा
- Viral Video:सोशल मीडियावर रील बनवायच्या नादात महिलेच्या साडीला लागली आग;अन् पुढे जे झाले ते भयानकच पहा व्हिडिओ
- एक सेलिब्रिटी ज्याचे इन्स्टाग्रामवर 56 लाख फॉलोअर पण त्यास 200 जणांनीही मत दिलं नाही! त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
- वारंवार होत असलेल्या भांडणामुळे पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून केली हत्या, स्वतःहून पोलिस ठाण्यात झाला हजर.
- यावल तालुक्यात शेत शिवारात कापूस वेचणी करतांना सर्पदंश झालेल्या ३० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू.
- आजचे राशी भविष्य रविवार दि. २४ नोहेंबर २०२४