एरंडोल :- बांगलादेशात हिंदू धर्मियांसह अन्य अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांवर होणा-या अत्याचाराच्या निषेधार्थ बजरंग दल,राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषद,शिवप्रतिष्ठान,शहरातील सर्व महिला मंडळ,हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या निषेध मूक मोर्चात हजारो नागरिक,महिला,युवक सहभागी झाले होते. मोर्चात महिला व मुलींची उपस्थिती लक्षणीय होती.
बांगलादेशात होणा-या हिंदुंवरील अन्यायाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बांगलादेशात झालेल्या सत्तासंघर्षात कट्टरपंथीयांकडून हिंदू धर्मीय व अन्य अल्पसंख्यांक समाजाच्या नागरिकांवर अन्याय व अत्याचार करून
त्यांच्या मालमत्तांची जाळपोळ करून नुकसान केले जात आहे.मंदिरांची तोडफोड करून मूर्तींची विटंबना केली जात असून बांगलादेश सराकरने याकडे पूर्णपणे
दुर्लक्ष केले आहे.हिंदू महिला व मुलींवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांगलादेशात हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विविध हिंदू संघटना व सकल हिंदू समाजाच्यावतीने निषेध मूक मोर्चा काढण्यात आला.तसेच हिंदू संघटनांनी पुकारलेल्या बंदला शहरात व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापा-यांनी तसेच लहान व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून निषेध मोर्चात सहभाग नोंदवला होता.बंदमुळे शहरातील सर्व रस्त्यांवर आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट निर्माण झाला होता. शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांनी देखल बंदमध्ये सहभाग नोंदवला होता.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूक निषेध मोर्चास सुरुवात करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्गांवरून मूक मोर्चा नेण्यात आल्यानंतर प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराबाबत केंद्र सरकारने त्वरित
हस्तक्षेप करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.बंगलादेशातील हिंदूंना भारतात प्रवेश देण्यात यावा,सी.ए.ए.कायदा त्वरित लागू करण्यात यावा, भारतातील बांगलादेशी व रोहिंग्यांना त्वरित देशाबाहेर काढण्यात यावे,लव्ह जिहाद प्रतिबंधित कायदा करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निषेध मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या
पदाधिका-यांनी मनोगत व्यक्त करून बांगलादेश सरकारचा निषेध केला.निषेध मोर्चात सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी,महिला मंडळाच्या पदाधिकारी, महिला,नागरिक,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.शहर बंद व मूक निषेध मोर्चा शांततेत पार पडला.पोलीस निरीक्षक यांचेसह
उपनिरीक्षक शरद बागल व पोलीस कर्मचा-यांनी शहरात गस्त घालून सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
हे पण वाचा
- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी वारी एरंडोल शहरात संपन्न
- भडगावमध्ये मोहरम उत्सव उत्साहात संपन्न.!!!सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र.
- एरंडोल शहरातील भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या तत्काळ बंदोबस्तासाठी दिले निवेदन.
- एरंडोल येथील गांधीपुरा भागात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून चाळीस हजार रुपयांची लुट.
- अंजनी नदीचे अस्तित्व धोक्यात,प्रशासनाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष; नदीला आले गटारगंगेचे स्वरूप, सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहाचे दुर्गंधीयुक्त सांडपाणी पालिकेने सोडले नदीत.