जयपूर :- विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी तब्बल ९ दिवसांनंतर पुन्हा बाहेर काढला आहे. ही घटना राजस्थानातील जयपूर इथं घडली असून सदर तरुणीचा मृतदेह आता सवाई मानसिंह रुग्णालयात नेण्यात आला असून तिथं शवविच्छेदन केलं जाणार आहे.पती आणि त्याच्या नातेवाईकांनी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या व्यक्तींनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी जयपूर इथं राहणाऱ्या २२ वर्षीय अनम या विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. “अनम पाच महिन्यांची गर्भवती होती. ३० जुलै रोजी तिची प्रकृती एकदम चांगली होती आणि मी तिला भेटून आलो होतो. मात्र त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली,” असं अनमच्या वडिलांनी सांगितलं आहे.अनम आजारी असल्याचं कळताच तिच्या वडिलांनी अनमच्या सासरी धाव घेतली. परंतु अनमला उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याचं तिच्या वडिलांना सांगण्यात आलं.
अनमचे वडील रुग्णालयातही पोहोचले. मात्र तिथं अनम नव्हती. दुसऱ्या दिवशी थेट तिचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, माझ्या मुलीचा तिच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप अनमच्या वडिलांनी केला असून या प्रकरणाची अखेर आता पोलिसांनी दखल घेत विवाहित तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनंतर बाहेर काढला आहे. शवविच्छेदन अहवालातून नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा