जयपूर :- विवाहित तरुणीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी तब्बल ९ दिवसांनंतर पुन्हा बाहेर काढला आहे. ही घटना राजस्थानातील जयपूर इथं घडली असून सदर तरुणीचा मृतदेह आता सवाई मानसिंह रुग्णालयात नेण्यात आला असून तिथं शवविच्छेदन केलं जाणार आहे.पती आणि त्याच्या नातेवाईकांनी गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप महिलेच्या माहेरच्या व्यक्तींनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी जयपूर इथं राहणाऱ्या २२ वर्षीय अनम या विवाहित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. “अनम पाच महिन्यांची गर्भवती होती. ३० जुलै रोजी तिची प्रकृती एकदम चांगली होती आणि मी तिला भेटून आलो होतो. मात्र त्यानंतर सायंकाळी ५ वाजता तिची तब्येत बिघडल्याची माहिती तिच्या सासरच्या लोकांनी दिली,” असं अनमच्या वडिलांनी सांगितलं आहे.अनम आजारी असल्याचं कळताच तिच्या वडिलांनी अनमच्या सासरी धाव घेतली. परंतु अनमला उपचारासाठी रुग्णालयात हलवल्याचं तिच्या वडिलांना सांगण्यात आलं.
अनमचे वडील रुग्णालयातही पोहोचले. मात्र तिथं अनम नव्हती. दुसऱ्या दिवशी थेट तिचा दफनविधी करण्यात आला. दरम्यान, माझ्या मुलीचा तिच्या पतीने आणि सासरच्या व्यक्तींनी गळा आवळून खून केला आहे, असा आरोप अनमच्या वडिलांनी केला असून या प्रकरणाची अखेर आता पोलिसांनी दखल घेत विवाहित तरुणीचा मृतदेह ९ दिवसांनंतर बाहेर काढला आहे. शवविच्छेदन अहवालातून नेमकं काय सत्य समोर येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे पण वाचा
- Viral Video :”तू माझ्या आईला शिवीगाळ कशी काय करू शकतेस?” एकमेकींच्या झिंज्या उपटत दोन महिलांमध्ये तुफान राडा पहा व्हिडिओ.
- अपूर्ण अवस्थेतील घरकुल योजना पूर्ण करून बेघरवासीयांना घरकुले मिळून द्यावीत; एरंडोल येथील घरकुलांचे भिजत घोंगडे सोडण्याची आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे मागणी.
- घरगुती गॅस सिलिंडर मधून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्या टोळीवर अमळनेर पोलिसांच्या छापा, 38 गॅस सिलिंडर जप्त, चौघांना अटक.
- जळगाव एलसीबीच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; चार दुचाकी जप्त.
- Viral Video: गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरुजींचा घृणास्पद प्रकार विद्यार्थ्यांना चक्क….. पहा संतापजनक व्हिडिओ.