
सांगोला (मंगळवेढा) :- सहा वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून पोलीस अंमलदारांनी जप्त केलेल्या 7 लाख 85 हजार 969 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सांगोल्याचे सहायक फौजदार तथा तत्कालीन मुद्देमाल, नगदी कारकून अब्दुल लतिफ अमरुद्दीन मुजावर यांच्यावर सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.गुन्हा दाखल होताच, सहायक फौजदार फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तथा सहायक फौजदार अब्दुल मुजावर हे सांगोला पोलीस ठाण्यात कार्यरत असताना सन 2016 ते 2020 या कालावधीत विविध अंमलदारांनी सहा वेगवेगळ्या जुगारअड्डय़ांवर टाकलेल्या छाप्यात 7 लाख 85 हजार 969 रुपये जप्त केले होते. या सर्व पैशांचा अपहार करण्यात आला. नगदी कारकून यांनी ही रक्कम विहित मुदतीत शासनास भरणा केली नसल्याची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक सचिन जगताप यांनी दिली.
त्यानंतर 20 ऑगस्ट 2024 रोजी सहायक फौजदार अब्दुल मुजावर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास मंगळवेढय़ाचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण करीत असून, आरोपीच्या शोधासाठी त्यांनी विशेष पथक नेमले आहे. या पथकाने सोलापूर शहर व अक्कलकोट तालुका पिंजून काढला आहे. मात्र, आरोपीस पकडण्यास यश आले नाही. दरम्यान, शासकीय रकमेवर कायद्याचे रक्षणकर्त्या पोलीस अधिकाऱ्यानेच डल्ला मारल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
हे पण वाचा
- 80 हजारांची लाच स्वीकारताच एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव सरपंचांसह तिघांना एसीबीने ठोकल्या बेड्या.
- आजीची शेवटची इच्छा माझ्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांसह अंतिमसंस्कार करा.पण चोरट्यांनी साधला डाव,अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी.
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयात छापा,अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये सापडले पैसे
- महाराष्ट्रातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित
- मुलीचा प्रथम वाढदिवस कन्या बचाव जागर कार्यक्रमाने साजरा