VIDEO बिहार :- लग्न ही कोणत्याही महिला किंवा पुरुषाच्या आयुष्यातील मोठी गोष्ट असते. काही जणांना वैवाहिक आयुष्यात अपयश येतं, घटस्फोट होतात. त्यापैकी काही जण दुसऱ्यांदा लग्न करतात, तर काही जण लग्न करत नाहीत; पण सोशल मीडियावर जो होत आहे, तो पाहता असं वाटतंय, की बिहारमधल्या एका महिलेसाठी लग्न म्हणजे अगदीच किरकोळ गोष्ट आहे.या व्हिडिओत ही महिला असं सांगते, की तिने आतापर्यंत 20 वेळा लग्न केलं आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यावर सोशल मीडिया युझर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
सोशल मीडियावर एका मुलीचा होत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी वधूचे कपडे घालून बेडवर बसलेली दिसत आहे. एक व्यक्ती तिला प्रश्न विचारत आहे, की तू आतापर्यंत किती लग्नं केली आहेस? त्यावर ती आतापर्यंत 20 लग्नं केली आहेत, असं उत्तर देते.या व्हिडिओमध्ये ती मुलगी म्हणत आहे, की तिचं वय सध्या 30 वर्षं असून, तिने आतापर्यंत 20 लग्नं केली आहेत. यापैकी तिच्या पाच-सहा पतींचा मृत्यू झाला, तर इतर पतींनी तिला सोडून दिलं. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे.

व्हायरल व्हिडिओवर लोकांच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण हा व्हिडिओ पाहून मजा घेत आहेत, तर काही जण या व्हिडिओला स्क्रिप्टेड म्हणत आहेत. एका सोशल मीडिया युझरने लिहिलं आहे, की ही मुलगी 20 वेळा खरंच लग्न करू शकते का? दुसऱ्याने लिहिलं, की दोन-चार लग्नांनंतर नवरे थांबले नाहीत; पण आता तरी थांब. तुला नेमकं काय करायचं आहे?एका सोशल मीडिया युझरने लिहिलं, की हा व्हिडिओ स्क्रिप्टेड वाटत आहे. त्यामुळे यावर विश्वास ठेवता येणार नाही. आणखी एका युझरने लिहिलं, की ही मुलगी खोटं बोलत आहे. सोशल मीडियावर व्ह्यूज मिळावे यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात, त्यापैकीच हे असावेत. समाज कुठे चालला आहे? हे आवरा. नाही तर गोंधळ होईल, असं आणखी एका युझरने लिहिलं आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






