४२ वर्षीय पत्नी २७ वर्षीय तरुणाच्या प्रेमात दोघं, पांच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पती होता अडथळा पत्नीने प्रियकराच्या सोबतीने पतीची केली हत्या

Spread the love

अलवर (राजस्थान) :- येथे अनैतिक संबंधातून पत्नीने पतीची हत्या केलीय. पत्नीचं एका व्यक्तीवर प्रेम होतं. तर पती दारूच्या आहारी गेला होता. पती सतत त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केली.हत्येनंतर शीर कापून धड एकीकडे आणि शीर एकीकडे फेकून दिलं. पोलिसांना मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. आता पत्नीला अटक केली असून प्रियकर फरार झाला आहे.

दारुड्या पतीपासून सुटका व्हावी यासाठी पत्नीने प्रियकराला पतीची हत्या कऱण्यास सांगितलं. प्रियकराला तिने चाकू आणून दिला आणि पतीचा खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नदीच्या किनारी फेकून दिला. पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा काही तासातच केला.पोलिसांनी सांगितले की, अलवरच्या मालाखेडा परिसरात राहणाऱ्या रामपाल मीणा यांची हत्या करण्यात आली. रामपाल हा व्यवसायाने ट्रक चालक होता. त्याला दारूचं व्यसन होतं. पत्नीला मारहाणही करायचा. त्याची पत्नी छोटी देवी हिच्याकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.

शुक्रवारी रामपालचा नग्नावस्थेतील मृतदेह थानागाजी परिसरात आढळला होता.पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ओळख पटवली आणि मालाखेडा इथं त्याच्या घरापर्यंत पोलीस पोहोचले. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता पत्नी छोटी देवीचे सुभाष नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि दोघे पाच वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याची माहिती मिळाली. यानंतर पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं.

छोटी देवी पतीच्या त्रासाला कंटाळली होती. रामपालला टीबीचा त्रास होता. तो दारू पिऊन मारहाण करायचा. तर छोटी देवी जवळच्याच कारखान्यात काम करणाऱ्या सुभाषसोबत लिव्ह इन मध्ये राहत होती. याची माहिती काही दिवसांपूर्वी रामपालला समजली. यावरून रामपाल आणि छोटी देवी यांच्यात वाद झाला. तेव्हा रामपालसोबत सुभाषने मैत्री केली. त्यानंतर दारू पाजून एका हॉटेलच्या खोलीत चार पाच दिवसांसाठी ठेवलं. गुरुवारी रात्री दारुच्या नशेत असलेल्या रामपालची हत्या केली. छोटी देवीच्या सांगण्यावरून नग्न करून नाक आणि गळा कापण्यात आला.पोलिसांनी सांगितले की, छोटी देवीपेक्षा सुभाष हा १७ वर्षांनी लहान आहे. त्याचं वय २७ वर्षे इतकं आहे. तर छोटी देवी ४२ वर्षांची आहे. छोटी देवीला दोन मुलंही असून ती १६ आणि २० वर्षे वयाची आहेत. तर पती रामलालचं वय ५२ वर्षे इतकं होतं.

मुख्य संपादक संजय चौधरी