अवैध वाळुचे ट्रॅक्टरवरील दंड कमी करण्यासाठी धुळे प्रांतधिकारी कार्यालयातील महसुल सहाय्यकास १३ हजार रु. लांच स्वीकारताना ACB ने रंगेहाथ पकडले.

Spread the love

धुळे: – तक्रारदार याच्या चुलत भावाचे अवैध वाळुचे ट्रॅक्टर दि.२४.०२.२०२५ रोजी मौजे कोकले ता. साक्री शिवारात वाहतुक करतांना महसुल विभागाच्या भरारी पथकाने पकडुन सदर टॅक्टरचा पंचनामा करुन तहसिलदार साक्री कार्यालयात जमा केले होते. तहसिलदार साक्री यांनी सदर ट्रॅक्टरवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, धुळे कार्यालयात अहवाल पाठविला होता.

नेमकं काय आहे प्रकरण

त्यानंतर तक्रारदार हे त्याच्या भावाच्या सांगण्यावरुन दि. ०५.०३.२०२५ रोजी ट्रॅक्टरची चौकशी करण्याकरीता उपविभागीय अधिकारी, धुळे येथे गेले असता तेथे हजर असलेले महसुल सहायक दिनेश वाघ यांनी ट्रॅक्टरवर १,२५,०००/- रुपये दंडाची नोटीस काढुन देवुन आकारणी केलेल्या दंडाची रक्कम प्रांताधिकारी श्री. रोहन कुवर यांचेकडुन कमी करुन देण्यासा तक्रारदार यांच्याकडे १५,०००/- रुपये लाचेची मागणी केल्य तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात दि. ०७/०३/२०२५ रोजी समक्ष येवुन दिली होती.त्याअनुषंगाने दि. ०७/०३/२०२५ रोजी व दि. १०/०३/२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता महसुल सहायक दिनेश वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्याकडुन कमी करुन देण्याकरीता तडजोडीअंती १३,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर काल दि. १०/०३/२०२५ रोजी सापळा कारवाई दरम्यान दिनेश सुर्यभान वाघ, महसुल सहायक (गौण खनिज) याने उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) कार्यालय धुळे येथे लाचेची रक्कम १३०००/- रुपये पंचासमक्ष रंगेहात स्वीकारतांना पकडले असुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ व ७ – अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप-अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक संजय चौधरी